मौजे रमतापुर तालुका देगलूर येथे गणेश विसर्जना वेळी ड्रोन द्वारे पुष्पवृष्टी
मौजे रमतापूर तालुका देगलूर येथे श्री गणेश विसर्जना वेळी गुलालाचा उपयोग न करता, ड्रोन द्वारे पुष्पवृष्टी करत विसर्जन पार पडण्यात आले.
यावेळी मो. रमतापूर येथे गेल्या वीस वर्षापासून बिनविरोध असलेले सरपंच तथा बाजार समिती संचालक श्री नारायण पाटील, अशोक देसाई, उपसरपंच पांडुरंग धोंडीबा पांढरे, पोलीस पाटील ज्ञानोबा कोळनुरे, सुनील शिंदे, बालाजी शिंदे, शिवा ठावरे, अनिल बिरादार, संतोष बिरादार, अशोक गिरी, पांडुरंग मानूरे, विठ्ठल बिरादार, अरुण पाटील, पंकज बिरादार, शिवाजी पाटील, विलास बिरादार, तानाजी पाटील पंढरी बिरादार व्यंकट बिरादार, गावातील इतर मान्यवर व अनेक कार्यकर्ते, नागरिक बाप्पांच्या विसर्जना वेळी उपस्थित होते.
श्री गणेश विसर्जना वेळी विशेष आकर्षण व प्रबोधन म्हणजे गूलाला ऐवजी ड्रोन द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच सतत नऊ दिवस सकाळी नाश्त्याची व्यवस्था तर दुपारी गोड जेवणाची व्यवस्था होती.
श्री गणेशा जवळ असलेल्या नैवेद्याची बोली लागली यात ….. लाडू ५१ हजार पाचशे (राजू अशोकराव देशपांडे) तर सफरचंद २१ हजार पाचशे (नितीन व्यंकटराव बिरादार)