*जनसंवाद आणि पत्रकारितेत मिलिंद वाघमारे यांना सुवर्ण पदक*
देगलूर: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात माध्यमशास्त्र संकुलातील विद्यार्थी मिलिंद वाघमारे एम. ए. जनसंवाद आणि पत्रकारितेत विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल शास्त्रज्ञ बी. सरवणन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, खंडू वाघमारे यांच्या उपस्थितीत सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
मिलिंद वाघमारे हे देगलूर तालुक्यातील कूशावाडी हे गाव असून तालुक्यात तसे राजकीय दृष्ट्या परिचित आहे. वाघमारे यांचे आई वडील शेती करत ग्रामीण भागातील अडचणीवर मात करीत शिक्षणावर आस्था असणाऱ्या आई वडिलांनी मिलिंद वाघमारे यांना नेहमीच प्रेरणा दिली तर लग्नानंतरही धर्मपत्नी कोमल वाघमारे यांनी साथ दिली.
कौटुंबिक जबाबदारी असताना सुध्दा शिक्षण घेण्याची जिज्ञासा व इतरांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. ग्रामीण भागातून पत्रकारितेत शिक्षण घेऊन शेतकरी, कामगार, रोजगार आणि ग्रामीण-शहरी समस्या आणि त्याचे निरसन करावे या उद्देशाने वाटचाल करणार असल्याचे मिलिंद वाघमारे यांनी सांगितले.