*किसान कामगार यात्रेची जय्यत तयारी*
देगलूर: शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब
यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किसान कामगार संवाद यात्रेची तयारी. भोकसखेडकर, शहाजी पाटील बाबरे, सुधाकर मोघे, माधव हुगे, शंकर काळे, गोपाळ मोरे, बाळू काळे, मनमत काळे, निशिकांत कांबळे, धनाजीभाऊ जोशी, अविनाश सूर्यवंशी, दशरथ सुर्यवंशी, अक्षय देवगिरे, सतीश भुरे, श्याम भुरे हे उपस्थित होते. खऱ्या अर्थाने जोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होत नाही तोपर्यंत खरी प्रगती होणार नाही. दिवस रात्र शेतात राबून त्यांच्या शेतमालाला भाव नसते, नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत असते याच अनुषंगाने
शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग व गोरगरीब जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व प्रबोधन करण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर, शनिवारी मौजे करडखेड येथून निघणाऱ्या किसान कामगार संवाद यात्रेला ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आज विश्व परिवाराचे संस्थापक कैलास येसगे यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव, सांगवी, करडखेड या परिसरातील शेतकरी शेतमजुरांशी संवाद साधून निमंत्रण देण्यात आले. त्याचबरोबर देगलूर शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या संवाद यात्रेत सहभागी, होण्याबाबत आवाहन कैलास येसगे बाबू पाटील यांच्याद्वारे करण्यात आली करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत प्रामुख्याने शिक्षणाचे कंत्राटीकरण व खाजगीकरणाबाबत प्रबोधन करण्यात आले.