मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम अंगणवाडी तडखेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी: हानमंत कदम
मोबा. 8698803982
देगलूर – खानापूर विभाग
राष्ट्रीय पोषण माह २०२३ तडखेल येथे, मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम मौजे. तडखेल अंगणवाडी येथे पार पडला. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश्य हे बालकांच्या योग्य शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे. अर्भक मृत्यू, बालमत्यू, कुपोषण व शाळा गळतीच्या प्रमाणात घट करणे. बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेसाठी प्रभावी समन्वय कायम ठेवणे हे होय.
याच अनुषंगाने मेरी मिट्टी मेरा देश हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत (सरपंच) सौ.राहुबाई दशरथ गायकवाड व कमलबाई नागनाथराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी (अं. सेविका) हानमंते सागर विठ्ठलराव (अं. सेविका) मुंडकर इराबाई माधवराव (अं. सेविका) करखेले मंगला माणिकराव (अं. सेविका) इंदूरी बेबिताई नामदेव, रेखा यादव गोरनाळे (अं. वर्कर) द्रौपतभाई दिंडे (अं मदतनीस) गंगाबाई संबडे (अं. मदतनीस) रुकमीनबाई कांबळे (अं.मदतनीस) शोभा कांबळे (अं.मदतनीस) सुनिता गायकवाड (अं. मदतनीस) तसेच हानमंत सूर्यकांत कदम (पत्रकार) तसेच अंगणवाडीतील विद्यार्थी विद्यार्थिनी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.