
🔴 पत्रकार धम्मानंद भेदेकर यांना धम्म सारथी पुरस्कार प्रदान
शिवगर्जना न्यूज,
बिलोली प्रतिनिधी विलास शेरे
बिलोली तालुक्यातील मौजे चिटमोगरा येथील सामाजिक चळवळी तील अभ्यासु व्यक्तीमत्व तथा पत्रकार धम्मानंद
भेदेकर यांना बेटमोगरा येथिल बु.दत्ता गंगाराम सोनकांबळे यांच्या व्दितीय स्मृती दिनानिमित्त मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सेवाभावी संस्था बेटमोगरा यांच्या वतीने दिला जाणारा धम्म सारथी हा पुरस्कार पत्रकार धम्मानंद भेदेकर यांना देऊन गौरविण्यात आले.
चिटमोगरा तालुका बिलोली येथील ग्रामीण भागातील एक निर्भीड पत्रकार म्हणून गेल्या एक दशकापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धम्मानंद भेदेकर यांच्या कार्याची दखल घेऊन बेटमोगरा तालुका मुखेड येथील मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सेवा भावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा सन २०२५ चा धम्म सारथी हा पुरस्कार दि.१४ फेब्रु. रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवर मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी भंतेजी संघप्रिय राहूननगर नांदेड, केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हौसाजी वारघडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे, भारतीय बौद्ध महासभेचे मुखेड तालुका अध्यक्ष तथा पत्रकार गंगाधरजी सोंडारे, डॉ. राहुल कांबळे, युवा व्याख्याते तथा उप सरपंच सिद्धार्थ कांबळे बेळीकर, वंचित बहुजन आघाडी मुखेड तालुका संघटक ॲड. जयजी भारदे, ॲड. सचिन वाघमारे,मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर मंडळीच्या शुभहस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच संध्याकाळी ९.०० वाजता भिम शाहिर दिपक कांबळे, संजय भारदे यांचा बुद्ध भिम गणिताचं कार्यक्रम संपन्न झाला.















