21.6 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

*देगलूर तालुका प्रशासनातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण*

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन अमृत
महोत्सवानिमित्त देगलूर प्रशासना तर्फे नगरेश्वर मंगल कार्यालय देगलूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यात शहरातील अनेक शाळेंचा सहभाग नोंदविला होता. यावेळी सावित्रीबाई फुले देगलूर शाळेतील विद्यार्थिंनी मीनाक्षी बालाजी वरखिंडे आपल्या ग्रुपसह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सावित्रीबाई फुले शाळेच्या ग्रुप साठी मुख्याध्यापक श्री गजभारे सर, पाटील सर, श्री सूर्यवंशी सर, श्री पवार सर, कपाळे सर, पाळेकर सर, आदींनी चांगल्या प्रकारे परिश्रम घेतले. यावेळी उपजिल्हाधिकारी माननीय कुलदीप जंगम, माननीय तहसीलदार राजाभाऊ कदम, माननीय बी.डी.ओ. शेखर देशमुख, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार बालाजी सुरनर, गटशिक्षणाधिकारी तोटरे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या