9.6 C
New York
Tuesday, April 7, 2026

Buy now

spot_img
spot_img

*श्री गणेश उत्सवानिमित्त देगलूर शहरात विविध सुविधा उपलब्ध करून देणे बाबत नगरपरिषदेस निवेदन*

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे देगलूर मुख्याधिकारी यांना श्रीगणेशोत्सवाच्या अगोदरच विविध सुविधा पुरविणे बाबत निवेदन देण्यात आले.*

देगलूर: शहरात आज मुख्याधिकारी नगर परिषद देगलूर यांना श्रीगणेशोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी सुरुवातीसच शहरातील रस्त्यावरील झालेले खड्डे बुजविणे, श्रीगणेश भक्तांसाठी मिरवणूकी दरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुरूम अंथरण्याची व्यवस्था करणे तसेच शहरात जागोजागी श्रीगणेश मंडळाच्या परिसरात साफ सफाईदार करण्यास नगरपालिका कर्मचाऱ्यांना सूचना देणे तसेच व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना नगरपालिके मार्फत अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी शशांक पाटील (ता. अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस देगलूर), सुमित कांबळे (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस देगलूर), शिवकुमार डाकोरे (जि. सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड), गजानन कांबळे (जिल्हा सहसचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड), साई गंदपवार (शहराध्यक्ष बूथ कमिटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ओमकार उल्लेवार (शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस देगलूर), योगेश हवेलीकर आदी लोक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या