*आयुश्मान भव: अभियानाचा देगलुर उपजिल्हा रुग्णालयात शुभारंभ.*
१३/०९/२०२३ आज राज्य स्तरिय अभियान शुभारंभ सह देगलुर उपजिल्हा रुग्णालयात आयुश्मान भव: अभियानाचा शुभारंभ सोहळा माननीय आमदार जितेश अंतापुरकर, नवनियुक्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवनिकर यांच्या हस्ते संपन्न झाला. अभियानाची सुरूवात डॉ. सुनील जाधव यांनी राष्ट्रगीत गायन करून झाली. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, आयुष्मान मेळावा, बालक व तरुण आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमयुक्त हॆ अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी नगर पालिका मा. मुख्याधिकारी सुंदर बोन्दर, आहे डॉ. अनिल थडके, डॉ. मलशेटवार विश्वनाथ, डॉ. संभाजी पाटील, डॉ. अश्विन पाटील, डॉ. अश्विनी गउळकर,डॉ.उस्मान, डॉ. पाटील, डॉ.मिलिंद शिकारे, डॉ.मोनि, डॉ. सुनील जाधव, डॉ. संजय लाडके, डॉ. मुजीब, डॉ. इंगळे संजय, मनिषा बोइनवाड सिस्टर, छाया पाटील, अभिजीत दामेकर, दिपक सूर्यवाड सह सर्व कर्मचारी, सिस्टर्स, उपस्थित होते. तसेच यावेळी अवयव दानाची प्रतिज्ञा देण्यात आली. प्रस्तावित डॉ. नरेश देवणीकर यांनी केले. सूत्र संचालन संजय लाडके यांनी तर आभार डॉ. मुजीब यांनी मानले. गाईडलाईन नुसार डॉ. सुनील जाधव यांनी राष्ट्रगीत गायन करून अभियान शुभारंभ सोहळ्याची सांगता करण्यात आली.