21.6 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात साजरी.

🔴 राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात साजरी. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव

सांगली : दि. ३/१/२०२५ रोजी स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानात अभिवादन करत, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रावस्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष डाॅ.सुधीर कोलप व आशाताई साबळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

चंद्रकांत चौधरी यांनी माता सावित्रीबाई यांच्या जन्मा पासून केलेल्या कार्याचा वृत्तांत सांगितला. पहिल्या महिला शिक्षक होत्या त्याचा जन्म ३ जानेवारी १९३१रोजी सातारा जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. विशेष म्हणजे शिक्षणाच्या खऱ्या अर्थाने प्रथम महिलांना शिक्षण देऊन भारता मध्ये क्रांतीची बीजे रोवली. 

यावेळी माजी उपायुक्त चंद्रकांत चौधरी, बौध्दाचार्य दयानंद कांबळे, आप्पासाहेब साबळे, अजय उबाळे, सचिन ऐवळे अविनाश कांबळे, शंकर कांबळे, गजानन गस्ते, बाबासाहेब गाडे, कन्हैया जगधने, शिवाजी वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या