18.7 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सॅटर्डे – संडे ग्रुप तर्फे अभिवादन.

🔴 सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सॅटर्डे संडे ग्रुप तर्फे अभिवादन. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी – डॉ संदीप काकड 

नाशिक आज दि. ३ जानेवारी २०२५ रोजी ८० हुन अधिक सायकलिस्टच्या उपस्थितित सॅटर्डे संडे ग्रुप नासिक यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त २१ रिंगण करून सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांचा स्मारकाला सकाळी सात वाजता सगळ्या सायकलिस्टने अभिवादन केले‌ . सायकल राईडला फ्लॅग ऑफ बाबू दादा ताजनपुरे, किशोर माने‌ माजी अध्यक्ष नाशिक सायकल लिस्ट यांनी केला. सावित्रीबाई यांच्या स्मारकाला त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे आज सर्व स्त्रिया उच्च पदावर काम करत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, सीए सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत. जय ज्योती, जय क्रांती सावित्रीच्या लेकी घेत आहेत भरारी फुले दांपत्य यांचे भारतरत्न पेक्षा मोठे कार्य सायकल चालवा पर्यावरण वाचवा अशा घोषणांनी मुंबई नाका दुमदुमला. सूर्यकांत आहेर यांनी उत्कृष्ट घोषणा दिल्या. मीरा जोशी चंदाराणी गवारे या सीनियर सायकल लिस्ट दररोज ५० किलोमीटर पेक्षा जास्त सायकलिंग करत आहेत. शिवाजी काकड, कैलास भागवत हे दररोज १०० किलोमीटर राईड करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत आहेत. सायकल चालवा पर्यावरण वाचवा असा संदेश देत शंभर हून अधिक सायकलीस्ट यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. वारुंगसे गोविंद शिंदे यांनी राईड यशस्वी होण्यासाठी विशेष कष्ट घेतले. सॅटर्डे संडे ग्रुप मध्ये ५० पेक्षा अधिक महिला दररोज कमीत कमी २१ किलोमीटर सायकलिंग करत आहेत. सॅटर्डे संडे ग्रुपचे अध्यक्ष सौ. तृप्तीदा काटकर यांनी राईडचे आयोजन केले. नासिक महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या संकल्पनेतून ही राईड करण्यात आली.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या