8.2 C
New York
Sunday, April 26, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी — प्रकाश कांबळे

🔴 मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी — प्रकाश कांबळे

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड जि. प्रतिनिधी :

नादेड, मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी ही निवड जाहीर केली आहे.

नांदेड जिल्ह्याच्या वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ कणखर, वस्तुनिष्ठ, रोखठोक, सामान्यांच्या हितासाठी आपली लेखणी झिजवणारे द्रष्टे पत्रकार म्हणून प्रकाश कांबळे यांची ओळख आहे. माध्यमात अत्यंत निष्ठेने काम करीत असतांनाच मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिक आणि समर्पित भावनेने पार पडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी शासन दरबारी आवाज उठविला आहे. पत्रकारितेतील आणि मराठी पत्रकार परिषदेतील त्यांच्या एकूण कार्याबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज प्रकाश कांबळे यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

या निवडी बद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सुरभाई, डिजिटल मीडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे यांच्यासह मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकाश कांबळे यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, पत्रकार ज्ञानेश्वर डोईजड, अविनाश देशमुख, शेखर पाटील, शिवाजी कोनापुरे, सुनील पौळकर, अनिल कांबळे, विजय बनसोडे यांनी प्रकाश कांबळे यांचा नांदेड येथे येऊन सत्कार केला.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या