
🔴 देगलूर पुरवठा अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा.
◼️पुरवठा विभाग अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा. अन्यथा आंदोलन — अंकुश सूर्यवंशी
शिवगर्जना न्यूज,
देगलुर : प्रतिनिधी
देगलुर :- एकंदरीत पाहता केंद्र तथा राज्य सरकार गरिबांना एक वेळचे पोटभर अन्न कसे देता येईल यासाठी विविध योजनांचा वापर करून ते राबविण्यात मग्न असतांना देगलूर तालुक्यातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याच्या गजब कारभारामुळे सामान्य नागरिक अत्यंत त्रासली असल्याची खंत व्यक्त करीत संबंधित विभागाची चौकशी करून पुरवठा विभाग अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याची मागणी रेबल बॉईज ग्रुप देगलूरचे तालुकाध्यक्ष अंकुश व्यंकटराव सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात अनेक मुद्दे विषयांकित केले गेले ज्यामध्ये देगलूर तालुक्यातील गरजू आणि मुख्य पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना तात्काळ प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करावे. तसेच महाराष्ट्र शासनाने नागरिकांची सनद केलेली आहे. त्यानुसार पुरवठा अधिकाऱ्यांना कामकाज करण्याचे आदेशित करावे व नागरिकांची सनद प्रदर्शनी भागात लावण्यात यावे. शिवाय पुरवठा अधिकाऱ्यांचे नागरिकांशी असभ्य पणाचे वर्तन व संवाद हा कळीचा मुद्दा ठरत असल्याची, तक्रार तालुकाध्यक्ष सूर्यवंशी यांनी वार्ताहरांशी बोलताना केली आहे. अनेकांगी कारणांचा विचार करून पुरवठा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.
एक वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो वेळा तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. शिवाय दलालांच्या सुळ सुळाटामुळे मुख्य लाभार्थ्यांना त्याचा लाभ न मिळता इतरांनाच वितरित होत असल्याची ही खंत यावेळी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. हा सगळा गैर कारभार तात्काळ थांबवण्यात यावा. तसेच योग्य व पात्र अशा लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा. अन्यथा रेबल बॉईज ग्रुप कडून मोठे आंदोलन उभारण्यात येईल. असा इशाराही रेबल बॉईज ग्रुपचे तालुकाध्यक्ष अंकुश सूर्यवंशी यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞 (9923072242)















