
🔴 घुंगराळा येथील खंडोबा यात्रे निमित्त यंदा लंपी व्हायरसचा धोका नसल्याने पशु प्रदर्शना बरोबर घोड्याचे ही प्रदर्शन होण्याची शक्यता?
शिवगर्जना न्यूज,
ग्रा. नायगाव प्रतिनीधी : दिपक गजभारे
नांदेड जिल्हा माळेगाव यात्रेच्या नंतर जिल्हातील नायगांव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील खंडोबाची यात्रा दरवर्षी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर घुंगराळा गावात भरते.
या यात्रे निमित्त जंगी कुस्त्याचा फड ही भरत असतो. गेल्या कोरोना काळा पासून पशु प्रदर्शन भरविले जात नसले तरी यंदा यात्रेच्या निमित्ताने लंपी व्हायर्स चा धोका नसल्यास पशु प्रदर्शना बरोबर घोड्याचे प्रदर्शन भरण्याची शक्यता यंदा वर्तवली जात आहे. नायगांव तालुक्यातील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने समस्त गावकऱ्यांच्या व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सदरच्या यात्रेचे प्रचंड नियोजन व आयोजन दरवर्षी करण्यात येते
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा यात्रेच्या कुस्तीच्या दंगलीत महाराष्ट्र राज्यासह बाहेर राज्यातील महिला कुस्ती पट्टू तसेच बलाढ्य कुस्त्या खेळणारे पैलवान उपस्थिती लावणार आहेत.
यंदा लंपी व्हायर्सचा धोका नसल्यामुळे या घुंगराळा येथील खंडोबा रायाच्या यात्रेत पशु प्रदर्शना बरोबर घोड्याचे प्रदर्शन भरवण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह समस्त गावकरी विचार विनिमय करणार आहेत असे समजते.
प्रशासनाकडून घुंगराळा येथील यात्रे निमित्त कशी व्यवस्था होणार अशी चर्चा होतांना ऐकावयास मिळत आहे.















