16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️आ. राजेश पवार यांना मंत्रीपद मिळावे म्हणून ईश्वरास साकडे.

🔴  नवनिर्वाचित आ. राजेश पवार यांना मंत्रीपद मिळावे म्हणून गंगणबीडच्या महादेवाला व खंडेरायास साकडे

शिवगर्जना न्यूज,

नायगाव तालूका प्रतिनीधी : परमेश्वर जाधव

नायगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश संभाजीराव पवार यांनी तब्बल ४७ हजार ६२९ मतांचे मताधिक्य घेत दणदणीत दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे. मतदार संघात केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी एकतर्फी विजय मिळवलेला आहे. नायगाव मतदारसंघातील मागच्या कार्यकाळात अनेक मूलभूत जिव्हाळ्याचे प्रश्न आ. राजेश संभाजीराव पवार यांनी मार्गी लावलेले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित राहीलेली दुर्लक्षित कमे त्यांच्या माध्यमातून पुर्णत्वास गेली आहेत. तसेच केलेल्या न भूतो न भविष्य अशा विकासा बाबत त्यांच्या अंगी असलेली कामची दूर दृष्टी पाहता त्यांना मंत्रीमंडळात  स्थान मिळावे यासाठी आज महादेव मंदिर गंगणबीड येथे आभिषेक करून महादेव व घुंगराळा येथील खंडेरायास साकडे घालण्यात आले आहे.

महायुतीच्या जागावाटपात सुरुवाती पासून आ. राजेश संभाजीराव पवार यांची उमेदवारी निचीत झालेली होती. त्यामुळे कार्यकर्ते देखील मोठ्या जोमाने कामाला लागले होते, त्यांनी केलेल्या विकासकामांचे व्हीजन मतदार संघातील जनतेपुढे ठेवले. राजकीय घुसखोरी करत ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेल्या विरोधकांना आमदार राजेश पवार यांच्या विकास कामाची दहशत होती, त्यामुळे विरोधकांनी गट तट निर्माण करून घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु आ. पवार यांनी अत्यंत संयमाने हाताळत आ. पवार यांनी प्रचारातील आपले आघाडी कायम टिकून ठेवली. त्याचाच परिणाम आज एकतर्फी विजय त्यांना मतदार संघातील जनतेने मिळवून दिलेला आहे.

आ. राजेश पवार यांना मंत्रिपद मिळावे म्हणून देवाला साकडे घालण्यात आले या वेळी उपस्थित भाजपाचे जेष्ठ नेते देविदास बोमनाळे, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता पाटील ढगे, रणजित पा. कुरे, माधवराव कोलगावे, गजानन जुने, भाजपा महिला मोर्चा तालुक अध्यक्ष जयश्रीताई नरवाडे, भाजपा महिला मोर्चा नायगाव शहर अध्यक्ष पल्लवीताई वडजे, शरद पा. माहेगाव, भाजपा युवा मोर्चा नायगाव शहर अध्यक्ष राजु आप्पा बेळगे, परमेश्वर पा. कदम, श्रीराम पा. सुगावे, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पाटील जाधव कांडाळकर, संभाजी मिस्से, गोविंदराव उपासे, प्रकाश पा. हेडगे, गजानन पाटील कांडाळकर, माधव पा. बेद्रीकर, मारोती घंटेवाड, बालाजी घोसलवाड, नागेश मेटकर, भास्कर पा. बेलकर, भगवान पा ढगे, गजानन शिंदे, बळीराम पा. वडजे, युवराज पा लालवंडीकर, विजय गायकवाड, कैलास येरेवाड, योगेश जाधव, यांच्या सह अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या