🔴 व्हॉइस ऑफ मीडिया देगलूर तालुका अध्यक्ष पदी डॉ. निवृत्ती भागवत यांची निवड
शिवगर्जना न्यूज,
देगलूर ता. प्रतिनिधी (9923072242)
देगलूर, ज्येष्ठ पत्रकार मा. संदीप काळे यांच्या संकल्पनेतून पत्रकारांच्या कल्याणा सहीत सामाजिक हिताकरीता प्रामाणिकपणे लढा देण्यासाठी साकार झालेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या देगलूर तालुका अध्यक्षपदी प्रा.डॉ. निवृत्ती भागवत यांची तर कार्याध्यक्ष पदी फजल मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र भंडरवार व अनिल कदम यांना जिल्हा कार्यकारिणीत स्थान देण्यात आले.
देगलूर तालुका व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणीची लोकशाही पद्धतीने निवड करण्यासाठी दि.३० नोव्हेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मीडियाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गणेश जोशी, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, उपाध्यक्ष तुकाराम सावंत, जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी सर्वानुमते दैनिक देशोन्नती शहर प्रतिनिधी प्रा.डॉ. निवृत्ती भागवत यांची तालुकाध्यक्ष पदी तर दैनिक पुढारी तालुका प्रतिनिधी फजल मुल्ला यांची कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी रामचंद्र भंडरवार आणि दैनिक सकाळचे अनिल कदम यांना जिल्हा कार्यकारिणी वरती स्थान देण्यात आले. याप्रसंगी डॉ. गणेश जोशी, बाळासाहेब पांडे, तुकाराम सावंत, ऋषिकेश कोंडेकर यांनी संघटनेची ध्येय धोरणे आणि पत्रकारांची कर्तव्ये या संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष डॉ. निवृत्ती भागवत व फजल मुल्ला यांनी सर्वांचे आभार मानले. या बैठक प्रसंगी त्रिसीमानायकचे संपादक प्रकाश रेनगुंटवार, सतीष पांडवे, प्रा. भीमराव दिपके, शिवकुमार बिरादार, गंगाधर मठवाले, नरसिंग अन्नमवार, संतोष बावगे, शेख असलम, वसीम शहा पूरकर, मिलिंद हावरगेकर, दिगंबर जाधव आदी ईतर वर्तमानपत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर निवडणूक अतिशय आनंदमय खेळीमेळी वातावरणात पार पडली.
















