17.4 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

*मराठा आरक्षणासाठी नांदेड – हैदराबाद हायवे रोड चक्का जाम*

देगलूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज सोमवारी भल्या सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड हैदराबाद रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. नायगाव तालुक्यातील कृष्णूर, गगनबीड आणि पळसगाव या तिन्ही ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. रस्त्यावर टायर जाळून आणि लाकडे पेटवून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने आज नांदेड हैदराबाद मार्गावर अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. श्रावण सोमवार असल्याने श्रद्धास्थानी दर्शनासाठी तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या भाविक व नागरिकांची वर्दळ होती. सकाळी नोकरीला जाणाऱ्यांची संख्या ही भरपूर असल्याने नोकर वर्ग अडकून पडला आहे. वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.

अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नायगाव आणि कुंटूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी
आणि रस्त्यावर ठाण मांडल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या