
🔴 माननीय खासदार अशोकराव चव्हाण यांना ग्रंथालयाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन सादर.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर तालुका प्रतिनिधी
(9923072242)
देगलूर :
देगलूर तालुका सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघातर्फे मा. खासदार अशोकराव चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील ग्रंथालयाचे प्रश्न ४०% अनुदान वाढ, ग्रंथालयचे दर्जा बदल व नवीन ग्रंथालयास मान्यता सुरू करणे इत्यादी प्रलंबीत प्रश्न आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सोडवण्याचे साकडे घालण्यात आले.
ग्रंथालयाच्या विविध प्रश्ना संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२४ रोजी बैठक घेऊन प्रलंबित सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन संघटनेस दिले होते. परंतु एक महिना होऊन गेले तरी ग्रंथालयाचे प्रश्न अधांतरीत आहेत. त्या संदर्भातील फाईल अर्थ विभागाकडे प्रलंबित असून आपल्या माध्यमातून पाठपुरावा करून आचारसंहितेपूर्वी ग्रंथालयाचे प्रश्न सोडवण्याचे साकडे कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी घातले. निवेदनावर कर्मचारी संघाचे तालुका अध्यक्ष पुंडलिक कदम, सचिव यादव संगेवार, उपाध्यक्ष अंकुश वाघमारे, सहसचिव पद्मनाभन आचेमवार, जिल्हा कर्मचारी संघाचे अध्यक्ष गंगाधर पोतंगले, संघटक जय गुरुपवार, माधवराव गुंडूरे, आनंदराव कोसंबे, सूर्यकांत पाटील, शिवाजी पाटील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.















