25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️देगलूर महाविद्यालयात रा.से.यो. नव प्रवेशितांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

🔴 देगलूर महाविद्यालयात रा.से.यो. नव प्रवेशितांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न. 

शिवगर्जना न्यूज, 

 देगलूर प्रतिनिधी : (9923072242) 

अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नव प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. राजेश्वर धुडूकनाळे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.संतोष येरावार होते. 

दुसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणासह सूरुवात झाली. आपल्या मार्गदर्शनीय भाषणात प्रमुख वक्ते प्रा.डॉ.संतोष येरावार यांनी राष्ट्रीय सेवा योजना विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडविते असे संबोधित केले. 

यावेळी अध्यक्षीय समारोपात डॉ. प्रा. राजेश्वर धुडूकनाळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या सामाजिक योगदानावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.व्यंकट खंदकुरे यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.गणेश क्यादारे यांनी मानले.

कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना संयोजक डॉ.संजय देबडे व प्रा.डॉ.शेख परवीन यांच्या सह स्वयंसेवक व स्वयंसेविका जास्तीच्या  संख्येने उपस्थित होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या