25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास डॉ. मीनल ताई खतगावकर यांचा जाहीर पाठिंबा.

🔴 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास डॉ. मीनल ताई खतगावकरांचा जाहीर पाठींबा.

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मौजे ▪️बोळसा येथील महादेव मंदिर येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास नायगाव विधानसभा मतदार संघातील नेत्या डॉ.मीनलताई पाटील खतगावकर यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला.

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे शासन दरबारी अनेक निवेदने देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठलाच मोबदला मिळत नसल्याने उमरी, नायगाव, धर्माबाद तालुक्यातील शेतकरी सहभागी होत आहेत.

आज बोळसा येथे नवव्या दिवशी इज्जतगाव ता.नायगाव येथील शेतकरी बांधवांनी भगवानराव मनूरकर यांच्या नियोजनाखाली चालू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होत जाहीर पाठिंबा दिला यात डॉ.मीनलताई पाटील खतगावकर यांनी सहभाग नोंदवला. यापूर्वी अतिवष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना तात्काळ मोबदला मिळावा यासाठी शासनाला निवेदन डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी दिले होते. त्याबरोबरच शासनाने उपोषणकर्ते शेतकरी बांधवांची तात्काळ दाखल घ्यावी आणि सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा येणाऱ्या काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषण कर्त्ते शेतकरी बांधवसह डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी दिला.

याप्रसंगी हनमंतराव पा. चव्हाण, बाळासाहेब पा. खतगावकर व्हाईस चेअरमन नरसिंह सूतगिरणी, प्रा. रवींद्र पा. चव्हाण, नानाराव पा. शिंदे सरपंच, दत्ताहरी पा. कावलगड्डेकर, माधवराव पा. शिंदे, मधुकर पा. शिंदे, गोविंदराव माली पा. इज्जतगावकर, बाबाराव पा. शिंदे, विलास गोविंदराव पा. इज्जतगावकर, विठ्ठल पा. शिंदे, बाबुराव पा. शिंदे, विजय पा. कदम भायेगावकर, व्यंकटराव पा.कवळे, रामेश्वर पा. जाधव कुदळेकर, कैलास पा. हातनीकर, बापूराव पा, तिरुपती पा. जाधव, बाबुराव माली पा. इज्जतगावकर, शिवाजी पा. ईजतगावकर चेअरमन,बाबुराव मोहनराव पा, दिलीप पा. इज्जतगावकर, बालाजी पा. सूर्यवंशी, आनंदराव पा. कवळे, कैलास पा. कवळे, शंकर पा. खतगावकर, संतोष पा.पुयड रामतीर्थकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या