
🔴 आता मेणबत्ती नाहीच… होईल तर चौरंगच ….🔴
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ शाम जाधव
नाशिक : दिनांक २७/९/२०२४ अभिनय क्षेत्रामध्ये नाशिक मधील बरेचसे कलावंत आपलं नाव लौकीक मिळवत आहेत. मालिका असतील, चित्रपट असतील, नाटक असेल यामध्ये त्यांनी आपली अभिनयाची छाप पाडलेली आहे. अशीच एक नाशिकची अभिनेत्री प्रतिक्षा पगारे हिने छोट्या-मोठ्या कला अभिनयातून मालिका, वेब सिरीज, गाणे यातुन अभिनय करत मुंबई गाठली. मुंबईमध्ये संघर्ष करत असतानांच “पुन्हा एकदा चौरंग” या भव्य दिव्य अशा चित्रपटात आणि दिग्गज कलावंतांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली. २७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय या निमित्ताने तिने नाशिक मध्ये बऱ्याच ठिकाणी पोस्टरचे आणि ट्रेलरचे प्रकाशन केले गेले. परंतु विशेष म्हणजे वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी या ठिकाणी तिने या प्रकाशनासाठी हजेरी लावत आजी आजोबांच्या आशीर्वादाने सुरुवात करून त्यांच्या सोबत वेळ घालवला. आपला अभिनय तसेच चित्रपटाबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी वात्सल्य वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सतीश सोनार, योगेश पिंपळगावकर आणि संपूर्ण कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग नोंदवत प्रतीक्षा हिला चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. तिने देखील आजोबांशी संवाद साधत मला अशा ठिकाणी याचं प्रकाशन करायला मिळालं आणि त्यांचे आशीर्वाद मला मिळाले अशी आत्मीयतेने यावेळी आपली भावना व्यक्त केली.















