
🔴 सम्राट नगर येथील काँक्रिटी रस्त्याचे प्रलंबित कामाचा आज मार्ग मोकळा व शुभारंभ पार पडला.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
पट्टणकोडोली : दिनांक २०/०९/२०२४ रोजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे, ग्रामपंचायत च्या १५ वा वित्त आयोग फंडातून खूप वर्ष प्रलंबित असलेले सम्राट नगर येथील काँक्रीट रस्त्याचे काम आज मार्गी लागले, व सदर कामाचा शुभारंभ आज पार पडला. शुभारंभ प्रसंगी सम्राट नगर येथील नागरिकांकडून सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच , उपसरपंच यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच भाग्यश्री कोळी, उपसरपंच अमोल बाणदार, सदर कामासाठी पाठपुरावा करणारे ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे, रेखा डुम, कमल चोपडे , शरद पुजारी, मधुकर पोवार, सुधाकर पोवार, भारती अवघडे, कांचन जाधव, भारती तोडकर, मीनाक्षी रुकडे, आनंदा पाटील, रवी आडके, नाना मोठे, इत्यादी ग्रामपंचायत सदस्य व सागर कांबळे, धीरज जाधव, संदीप हासुरे, धीरज कांबळे, विल्यम कांबळे, अनिल यादव यांच्या सह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.















