
🔴 नांदेड जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का अखेर भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे राज्याचे माजी मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पा. खतगावकर डॉ. मीनलताई पा. खतगावकर व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे भा.ज.पा. स अखेरचा (?) राम राम ठोकत काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री आमदार अमितभैया विलासराव देशमुख व आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या उपस्थितीत टिळक भवन काँग्रेस कार्यालय मुंबई येथे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केले. असल्याने नांदेड जिल्ह्यातील भाजपाला मोठा धक्का बसला असून. खतगावकर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असून या पक्ष प्रवेशांचा असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील व शहरातील ठीक ठिकाणी फटाके वाजून जयघोष साजरा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. व नांदेड जिल्ह्यातील व नायगाव विधानसभेतील भा.ज.पा. चा कायापालट आत्ता नक्कीच होणार असे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात बोलल्या असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील सामोरे येत आहे. आता मात्र रवींद्र पाटील चव्हाण व डॉ. मीनलताई पाटील खतगावकर ये जास्तीत जास्त मताने निवडून येतील असे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात बोलल्या जात असल्याचे चित्र सामोरे दिसून येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ही भा.ज.पा. मध्ये गेले असता ते मंत्रिमंडळात जातील आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा व ग्रामीण भागाचा विकास होईल असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत भा.ज.पा. पक्षात जाण्याचा निर्धार भास्करराव बापूराव पाटील खतगावकर यांनी घेतला होता. भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपात गेल्यानंतर प्रामाणिक पणे काम करून सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याची कसलीही नोंद न घेता त्यांचा पदोपदी अपमान केले जात असल्याने अखेर दादांनी भा.ज.पा. ला धक्का देत पुन्हा काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला. नांदेड मधील विस्कळीत झालेल्या. काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट होईल आणि येणारी नांदेड पोटनिवडणूक लोकसभेचे उमेदवार रवींद्र पाटील चव्हाण व डॉ.मीनलताई पाटील खतगावकर जास्तीत जास्त मताने निवडून येतील. आणि नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला दादाचा नक्कीच मोठा फायदा होईल असे नांदेड जिल्ह्यातील व नायगाव विधानसभेतील नागरिकांतून व मतदारातून मोठ्या प्रमाणात बोलल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोबत नंदू पाटील रातोळीकर यांच्या सह काँग्रेस असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दादाच्या पक्ष प्रवेशाचा नांदेड जिल्ह्यातील व नायगाव विधान सभेतील ठिक ठिकाणी फटाके फोडून जय घोष मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.















