
🔴 नायगाव विधानसभा स्थानिक उमेदवार विजय पाटील चव्हाण यांच्या नावांची चर्चा.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
नायगाव उमरी धर्माबाद (८९) विधानसभा स्थानिक भूमिपुत्र विजय पाटील चव्हाण यांना द्या युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष विठ्ठल आप्पा बेळगे व नायगाव विधानसभेतील नागरिकांची मतदारांची मोठ्या प्रमाणात मागणी. १९९९ वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळाचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम २००४ ते २०१३ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव चे सभापती नायगाव नगरपंचायतीचे प्रथम उप नगराध्यक्ष २०१६ ते आज पर्यंतत्यांच्या नेतृत्वात नायगाव नगर पंचायतीचे १७ पैकी १७ उमेदवार निवडून आणले सर्व समाज बांधवासह चे सामाजिक उपक्रम राबवून मतदार संघात लोकांचे मने जिंकली आहेत. नायगाव उमरी धर्माबाद (८९) विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून मतदार व कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमात पसंती होत असून प्रत्येक युवा कार्यकर्त्यांना विजय पाटील चव्हाण आमदार व्हावे असे वाटत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी स्वर्गीय कै. वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांच्या निधनानंतर रवींद्र पाटील चव्हाण हे खासदार व्हावे व विजय पाटील चव्हाण आमदार व्हावे स्थानिक कार्यकर्ते सरपंच उप सरपंच सदस्य नगरसेवक नायगाव उमरी धर्माबाद (८९) विधानसभा मतदार यांच्यातून म्हणत आहेत. त्यामुळे याकडे पक्ष श्रेष्ठीने लक्ष देत काँग्रेस बलाढ्य करण्यासाठी उमेदवार पारखून द्यावे, अशी मागणी केली आहे.















