
🔴 कर्तव्यदक्ष फौंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबीर व डॉ. संदीप काकड यांचा जन्मदिवस जैन गुरुकुल आश्रम येथे उत्साहात संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. संदीप काकड
आज रविवार दिनांक १५/९/२०२४ सिध्दरेखा फाऊंडेशन भारत संस्थेचा प्रथम वर्धापन दिना निमित्त जैन गुरूकुल आश्रम येथील गरिब मुलांचे करीता वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री डॉ.निलेश कुंभारे व नाशिक शहर अध्यक्षा सौ डॉ. अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी ५५ मुलांचे आरोग्य चेकअप शिबीर व
औषधे उपलब्ध करण्यात आले तसेच अनेक मुलांना पावसामुळे ओलसर कापडे वापरल्याने खाज खुजली त्वचा चे अनेक अडचणी होत्या मुलांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना आवश्यक असणारे वस्तू ची माहिती घेण्यात आली व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री संदीप काकड यांच्या वाढदिवसा निमित्त मुलांना बिस्कीट, चॉकलेट वाटप करण्यात आले. कर्तव्यदक्ष फाऊंडेशन टिम कडून नास्ता पदार्थ वाटप करण्यात आले. डॉक्टर तसेच जैन गुरूकुल आश्रम चे मामाजी यांचे शाल पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम आयोजित कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन वतीने घेण्यात आला होता यासाठी श्री सुनील परदेशी विरेंद्र टिळे, राजेंद्र आहेर, सुभाष कापडी, जयवंत देशमुख, संदीप काकड, आदित्य पवार, रुपाली तांबारे सुनिता धनतोले कामिनी भानुवंशे, भाग्यश्री खुरपडे, सौ.रेखा काकड, स्वरा काकड उपस्थित होते याप्रसंगी जैन गुरूकुल आश्रम चे श्री मामाजी , सुनिल परदेशी, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले संदीप काकड यांनी आभार मानले.















