
🔴 देगलूर महाविद्याल स्वीप कॅम्पस ॲब्यासीडर पदी नियुक्ती —- पल्लवी कर्णे.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी : (९९२३०७२२४२)
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आणि नांदेड लोकसभा पोट निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने देगलूर महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मध्ये मतदान विषयक जन जागृती करण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत, बिलोली उप जिल्हाधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, देगलूर तहसीलदार मा. भरत सूर्यवंशी व प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांच्या मार्गदर्शना नुसार देगलूर महाविद्यालयात स्वीप कक्षाची SVEEP (Systematic Voters Education and Electoral Participation)स्थापना करण्यात आली आहे.
नव मतदारांमध्ये जनजागृती करणे, प्रबोधन करणे, मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी युवक – युवतींचे जास्तीत जास्त योगदान घेणे, ई.व्ही.एम. विषयी प्रचार व प्रसार करणे तसेच मतदानाचे पावित्र्य राखणे इत्यादी कार्यासाठी स्वीप कक्षाद्वारे महाविद्यालयाद्वारे विविध उपक्रम राबविन्यात येणार आहेत.
लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्र प्रमुख डॉ.बी.आर. कतुरवार यांची स्वीप (नोडल अधिकारी, देगलूर महाविद्यालय) म्हणून तर एम.ए. लोकप्रशासन प्रथम वर्गाची पल्लवी कर्णे कैम्पस ॲब्यासीडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.















