
🔴 नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा—- श्री विठ्ठल पाटील गवळी.
शिवगर्जना न्यूज,
नायगाव ग्रा तालुका प्रतिनिधी :दिपक गजभारे
नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व दूर पावसाने हाहाकार माजवला होता आणि सदरच्या पावसाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याचे पहायला मिळाले आहे. या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून व अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. याचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून व नांदेड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत तात्काळ जाहीर करण्यात यावे. अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांचे नेते व गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या जनसेवक म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न व गोरगरिबांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सर्व सामान्य जनतेला न्यायाच्या मुख्य प्रवाह मध्ये आणण्याचे काम समाजवादी पक्षाचे नांदेड युवक जिल्हाध्यक्ष मा श्री विठ्ठल पाटील गवळी यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
मागील आठवड्यामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सदृश्य पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यात अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून आणि अनेक शेतकऱ्यांच्या गुरा वासरांना देखील मोठी हानी झाली आहे. कुटुंबाचे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून याकडे प्रशासनाने फारसे लक्ष घालत नसल्याने मा श्री विठ्ठल पाटील गवळी यांनी शासन दरबारी शेतकरी व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी निवेदना द्वारे मागणी केली आहे. श्री विठ्ठल पाटील गवळी यांचे शेतकरी व सर्व सामान्य जनते विषयी असलेले प्रेम आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून जिल्ह्यातील संपूर्ण नदी नाले हे तुडूंब भरून गेल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी आपापले वर्चस्व पणाला लावून आगामी विधान सभेचे स्वप्न पहात असून मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना वाली कोण आशा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत असताना अशा गंभीर प्रश्नांना वाव देण्याकरिता विठ्ठल पाटील गवळी यांनी शेतकऱ्यांच्या व सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रशासनास वारंवार मागणी करून न्याय देण्याचे काम करत आहेत.















