16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️तहसीलदार यांनी नुसकानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन केली पाहणी लवकरच नुकसानीचे पंचनामे होणार.

🔴 तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड नायगाव यांची राहेर परिसरातील नुसकानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन केली पाहणी लवकरच नुकसानीचे पंचनामे होणार.

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव ग्रा. तालुका प्रतिनिधी : दिपक गजभारे 

नायगाव तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याभरात जोरदार झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला बॅक वॉटर मुळे पुराचे पाणी येऊन शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा मोबदला मिळावा. झालेले नुकसान भरून निघावे अशी नागरिकांची मागणी होती ती मागणी रास्त असून नायगाव तालुक्याच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी आपली महसूल ची टीम घेऊन राहेर, हुस्सा, सांगवी, मेळगाव, परिसराचा दौरा करून शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्या पिकाची माहिती घेत तात्काळ तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेश करत सदर पिकाची पंचनामे सुरू करा अशी आदेशित केले. यावेळी नायगाव तहसीलदार मा. धम्मप्रिया गायकवाड मंडळ अधिकारी आर के पवार कुंटूर तलाठी डाकेवार राहेर, तलाठी श्री पांडुरंग, सांगवी धनंज असे सर्व तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.

त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले आहे. हजारो हेक्टर शेती सोयाबीन कापूस मूग उडीद अशा पिकामध्ये गोदावरी नदीच्या बॅकवॉटर पाणी व पावसाचे येणाऱ्या पाण्यामुळे सर्वत्र दोन दिवस पूरस्थिती या परिसरात निर्माण झाली होती. दोन-तीन मंडळाचा पाऊस कुंटूर मंडळात दाखल झाल्याने पूर्ण पुराचे स्वरूप निर्माण झाले होते. यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार गायकवाड यांनी बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांच्या शेतात माहिती घेत तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेशात केल्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या