16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नायगाव पोलीसानी मांजरम येथील मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातील तीन आरोपीला घेतले ताब्यात.

नायगाव पोलीसानी मांजरम येथील मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातील तीन आरोपीला घेतले ताब्यात….

शिवगर्जना न्यूज, 

नायगांव ग्रा.तालुका प्रतिनिधी :दिपक गजभारे 

नायगांव पोलीसांनी मौ.मांजरम येथील मंदीरातील दानपेटी चोरीचे गुन्हयातील ३ आरोपीतांना अटक करून एकुण १५,३५०/- रुपयाचे मुद्देमाल केला जप्त मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी (Operation flush out) अंर्तगत सर्व प्रभारी अधिकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.

दि.०९/०९/२०२४ चे रात्री ०९.०० वाजता ते दि.१०/०९/२०२४ चे सकाळी ०५.०० वाजताचे दरम्यान मौजे मांजरम येथील शेषेराव व्यंकटराव मंगनाळे यांचे शेतातील महादेव मंदीरातील दानपेटी कोणीतरी अज्ञात चोटयांनी फोडुन त्यातील अंदाजे ३०,०००/- रुपये रक्क्म चोरुन नेले होते. सदर प्रकरणी सुभाष हावगीरराव मंगनाळे वय ५८ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन नायगाव येथे गु.र.न.२२८/२०२४ कलम ३०५ भा.न्या. संहिता प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास श्री अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नायगाव यांचे मार्गदर्शना खाली श्री प्रकाश अमृता पंडीत हे करीत होते.

दि.१२/०९/२०२४ रोजी तपास पथकातील पो.उप.नि. प्रकाश पंडीत व पो.कॉ./३१२ बालाजी शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्री लायक माहीती मिळाली की, मांजरम येथील महादेव मंदीरातील दान पेटीतील रक्कम चोरलेले आरोपी मांजरम येथील असुन सध्या मांजरम येथे असल्याची माहीती मिळाली. सदर बाबत वरीष्ठांना माहीती देवुन मांजरम येथुन आरोपी १. बाजीराव गोविंदराव शिंदे वय ३२ वर्षे रा. मांजरम यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन मांजरम येथील महादेव मंदीरातील दान पेटीतील रक्कम चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार २. गोविंद विठल शिंदे वय ३६ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव ३. शरद धनराज शिंदे वय २२ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव यांचे सह मिळुन केल्याचे कबुल केल्याने मांजरम येथुन आरोपी २) गोविंद विठल शिंदे वय ३६ वर्षे ३) शरद धनराज शिंदे वय २२ वर्षे दोघे रा. मांजरम ता. नायगाव यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्याने गुन्हे संबंधाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर तीन आरोपीचे ताब्यातुन १२६० रुपये किंमतीचे चांदीचे दागीने व १४०९० /- रुपये रोख रक्क्म असा एकुण १५,३५०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हयात जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीनां मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीतांना एम.सी.आर. केले आहे.

सदर ची कामगीरी मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा. श्री सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, श्री प्रकाश पंडीत, पोलीस उप निरीक्षक, श्री भिमराव कदम, पोलीस उप निरीक्षक पोहेकॉ/११३३ गणपत पेदे, पोहेकॉ / ९४१ बाबूराव चरकुलवार, पो.हे.कॉ./३४९ साईनाथ सांगवीकर, पोकॉ/३१२ बालाजी शिंदे, पोकॉ/ ८४२बालाजी बामणे यांचे पथकाने केली आहे. सर्व पथकांची मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या