
🔴 महावीर इंटरनॅशनल ५० व्या सुवर्ण जयंती महोत्सव साजरा करत आहे.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ संदीप काकड
नाशिक आज दिनांक ११/९/२०२४ रोजी सुवर्ण महोत्सव च्या पावन पर्वावर महावीर इंटरनॅशनल तर्फे समजा मध्ये आदर्श प्रस्थापित करणारे मान्यवरांचे पारितोषीक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. दि १५ सप्टेंबर २०२४ रविवारी दुपारी २:३० वाजता रोटरी हॉल गंजमाळ नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महावीर इंटरनॅशनल अध्यक्ष मा. अनिल नाहर व संपूर्ण कोअर कमिटी पदाधिकारी यांनी दिली यांनी दिली.
प्रमुख उपस्थिती खास आकर्षण मिस वर्ल्ड मा. नमिता कोहोक असणार आहे.
मानव सेवा चे अविरत सेवा कार्या साठी श्रीमती निर्मला राजमलजी चोरडिया, सौ. सुजाता – श्री आनंदजी चौरडिया व सौ मिनल – श्री मयुरजी चौरडिया यांचा परिवाराने उल्लेखनीय समाजसेवा साठी भामाशाह पुरस्कार ने सन्मानित करण्यात येणार आहे.
निर्भीड ज्योत पत्रकार संघ चे नाशिक ग्रामीण जिल्हा सचिव व रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज व “शिवगर्जना न्यूज” चे प्रतिनिधी डॉ. संदीप काकड यांना नवरत्न पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नवरत्न पारितोषीक साठी ११ मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात आशिष भंसली, अजित बोरा, ब्रिजलाल कटारिया जैन, निलयबाबू शाह, गुलशन कुमार चड्डा, डॉ नंदकुमार कासलीवाल, शांतीलालजी दुगड, ऍड विनयचंद जैन, सौ प्रणिता पाटील, कशिष कोचर आणी डॉ. संदीप विनायक काकड यांची निवड करण्यात आली.
आदर्श शिक्षक पुरस्कार साठी १५ आदर्श शिक्षक सन्मानित करण्यात येणार आहे. यात मनीषा जोंधळे, सुधा नरवाडे, भावना ठाकरे, अरिहंत देवरे, सुनीता देसले, मनीषा पंडित, स्वाती लोहारकर, शंकर ठाकरे, अनिल विधाते, पाटीलबा गधडे, दिपाली चोपडा, डॉ. मिना पाटील, सुनील बस्ते, सृष्टी गोदीया, माधुरी निफाडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले.















