
🔴 बौद्ध धम्म संस्कार संघ पट श्रावस्तीऔ विहार सांगली च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७८ वा वर्धापन दिन साजरा.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
सांगली : १५ ऑगस्ट भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने सकाळी आठ वाजता साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक कॅप्टन कुमार कांबळे आणि माजी सैनिक आनंदा कवठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगीत होऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला. त्यानंतर विहरामध्ये तथागत भगवान बुद्ध, सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून बुद्ध धम्म संघ या त्रिरत्न अनुसरून त्रीसरण पंचशील वंदना घेऊन कार्यक्रमात सुरुवात झाली. एस.आर. माने यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे माजी सैनिक कॅप्टन कुमार कांबळे आणि माजी सैनिक आनंदा कवठेकर यांचा सत्कार संस्थेचे सहाय्यक सचिव भारत कदम यांच्या हस्ते यांचा सत्कार संस्थेचे माजी सचिव प्राध्यापक अशोक भटकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन कुमार यांनी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल सांगितले. यानंतर विहाराचे संचालक सी.बी. चौधरी ईसा पूर्व में एक एक एक एक एक एक एक एक २४ तासला ट्विटरवर यांनी विहाराच्या वतीने ७८ व्या भारतीय 📖मंहं दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि मंगल कामना दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान स्वातंत्र्यासाठी मोलाचे असून त्यांना अर्थमंत्री पद आवश्यक होते, परंतु नेहरू नी कायदा मंत्री हे पद दिले. तरी पण – भारताचे प्रथम अर्थमंत्री सी.डी. देशमुख हे प्रत्येक सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घेऊनच अर्थमंत्री पदाचा कार्यभार हाताळीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मिती चे जनक आहेत संविधान मध्ये नमूद असलेल्या तरतुदी मुळेच आपला भारत देश आहे तो एक संघ आहे. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर या भारत देशाच्या संघ राज्याची छकले झाल्याशिवाय राहिली नसती. हैदराबादचे निजाम हे संस्थानिक होण्यास तयार होत नव्हते त्यावर वल्लभाई पटेल यांनी युद्ध करण्याचा पवित्र घेतला होता परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळ जवळ सहाशे संस्थाने विलीन करण्याचा यांचा सल्ला सरदार वल्लभाई पटेल यांना दिल्यामुळे युद्ध न करता सदर संस्थान ताब्यात घेतलेली आहेत. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युग पुरुष आणि खरे स्वतंत्र सेनानी आहेत. त्यांना विनम्र अभिवादन करून जय भीम, जय भीम, जय भीम असा जय घोष करून पुन्हा सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांनी त्यांच्या वाणीच पूर्ण विराम दिला. एस.आर. माने यांनी भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या तीन रंगाचा, अशोक चक्राचा इतिहास आणि त्याचे महत्त्व विशद केले. विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले व अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी या कार्यक्रमास बिनचूक पणे वेळेमध्ये उपस्थित राहिलेले सर्वांचे आभार मानून उपस्थितीत चांगली असल्याबाबत समाधान व्यक्त केले. दुपारी चार ते सहा या दरम्यान वर्षावास पावन पर्व निमित्त महाथेंरो डॉ. यश काशीपायन यांची धम्मदेशना असल्याने सर्वांनी दुपारच्या सत्रा मध्ये उपस्थित राहणे बाबत विनंती करून कार्यक्रमाची सांगता केली सदर कार्यक्रमास भारत कदम सहसचिव, प्राध्यापक अशोक भटकर, पारमित धमकीर्ती, अशोक वाघमारे,विजय लांडगे, राहुल विश्वनाथ कांबळे, संस्थेच्या उपाध्यक्ष सुनिता धम्मकीर्ती, संचालिका उषा कांबळे, दीपा कांबळे, तसेच सदस्य आशा चौधरी, सविता चौधरी, सुजाता घाडगे वहिनी इत्यादी महिलावर्ग उपस्थित होत्या.















