🔴 देगलूर शहरात भारतीय स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
देगलूर प्रतिनिधी : ९९२३०७२२४२
१५ ऑगस्ट २०२४ देगलूर उप जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार मा. जितेश अंतापुरकर, उप जिल्हाधिकारी अनुप पाटील, यांच्या हस्ते झेंडा वंदन उत्साहात पार पडले. डॉ. सुनील जाधव यांनी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन पर गीत अब तुम्हारे हवाले वतन साथियो सादर केले. पोलीस प्रशासन सलामी वेळी महात्मा फुले इंग्लीश स्कूल विद्यार्थी यांनी राष्ट्र गीत सादर केले तर डॉ. सुनील जाधव यांनी राज्य गीत गाऊन मानवंदना दिली.
यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, मा. तहसीलदार नागमवार, गटविकास अधिकारी मा. शेखर देशमुख, जेष्ट नेते माजी सभापती शिवाजीराव देशमुख, माजी नगर अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण सर, डॉ. भूमे, पोलीस निरीक्षक झुंजारे, नायब तहसीलदार सुरनर, मा. शिक्षणाधिकारी तोटरे, रातोळीकर तलाठी, ॲड. विरेंद्र पाटील, यांची प्रमुख उपस्थित होती. सौ. सृष्टी अनुप पाटील ताई यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, क्षेत्रातील अनेक दिग्गज देशप्रेमी व पत्रकार बांधव. देगलूर वासियांनी ७८ वा भारतीय स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा केला. सुत्र संचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले आभार रातोळीकर तलाठी यांनी व्यक्त केले .