18.7 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️देगलूर काँग्रेस कमिटी तालुका सचिव पदी लक्ष्मण पवार यांची नियुक्ती.

🔴 देगलूर काँग्रेस कमिटीच्या तालुका सचिव पदी लक्ष्मण पवार यांची नियुक्ती.

शिवगर्जना न्यूज,      

देगलूर (प्रतिनिधी) 

समाज स्तरावर विविध सामाजिक कार्याची छाप सोडणारे लक्ष्मण हनुमंतू पवार यांची नुकतीच देगलूर तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या तालुका सचिव पदी निवड करण्यात आली. काँग्रेस कार्यालय उद्घाटन सोहळा व काँग्रेस महाविकास आघाडी मेळाव्यात जिल्हाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. 

वडार क्रांती सेना जिल्हाध्यक्ष म्हणून समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय होतेच, शिवाय पत्रकारीतेत ही आपल्या कर्तृत्वाला साजेशे कार्य तडीस नेणारे लक्ष्मण पवार यांची या अगोदर ही राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली होती. याचे फलित आज पुन्हा देशाच्या राष्ट्रीय पक्षाच्या देगलूर तालुका सचिव पदी निवड झाल्याने समाजातील सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. सदरील निवडीच्या वेळी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर श्रावण रॅपनवाड, मोगलाजी शिरसेटवार, श्वेताताई बसवराज वन्नाळीकर, केदार साळुंखे, शमीम अब्दुल्ला, महेश पाटील, राजन देशपांडे आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा… 💐💐💐

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या