🔴 वाचन संस्कृती रुजविणे हीच काळाची गरज —- प्राचार्य डॉ.के. हरिबाबु
शिवगर्जना न्यूज,
नायगाव ता.ग्रा. प्रतिनिधी : दिपक गजभारे
नायगांव येथील शरदचंद्र महाविद्यालयच्या ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय ग्रंथालय दिन म्हणून साजरी करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरिबाबु यांनी डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतांमध्ये डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर वाचन संस्कृती रुजविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांचे पाऊल ग्रंथालयाकडे वळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तत्पूर्वी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.बी.आर लोकलवार यांनी पद्मश्री डॉ.एस.आर रंगनाथन यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या कार्याचा कार्याची माहिती उपस्थिताना करून दिली, यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.