
🔴 जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात न्यू इंग्लिश स्कूल नांदगावची वेदिका जाधव हिची विभागावर निवड.
शिवगर्जना न्यूज,
उप संपादक : स्वप्निल धनवटे
(नाशिक) नांदगाव : नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव या विद्यालयाने नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय आखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात कृत्रिम बुध्दिमत्ता- संभाव्यता व आव्हाने या विषयावर भाषण करुन विद्यार्थ्यीनी कु वेदिका संजय जाधव हिने द्वितीय क्रमांक मिळवत विभाग स्तरावर झेप घेतली.सदर मार्गदर्शन विज्ञान शिक्षक जी.व्ही. माताडे, ए.एस. व्हडगर, ए.व्ही. दुकळे, ए.ई. लाटे, पी.एस. फणसे, ए.एस. पगार, बी.ए. सोनवणे, बी.एन. जाधव, एन.पी. पाटील, एस.एस. बिडवे, जी.ए. ढोणे यांनी केले. या कामी सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले. तिच्या या यशाबद्दल मविप्र नांदगाव तालुका संचालक अमित भाऊ बोरसे पाटील, स्कूल कमिटी अध्यक्ष व्ही.वाय. काकळीज, मुख्याध्यापक बी.पी. बिन्नर, उप मुख्याध्यापक जी.ए. वैद्य, पर्यवेक्षक पी.एन. खुटे, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.















