16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मालेगांव शहरात चोरी केलेल्या एकूण ०७ मोटार सायकली जप्त.

🔴 मालेगांव शहरात चोरी केलेल्या एकूण ०७ मोटार सायकली जप्त. 

शिवगर्जना न्यूज, 

उप संपादक : स्वप्निल धनवटे

१,५०,०००/- रुपये किंमतीच्या मुद्दे मालासह कॅम्प पोलीस स्टेशन पोलिसांनी एका इसमास घेतले ताब्यात. 

मा.पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तसेच मालेगांव कॅम्प सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ तसेच मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे कडील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १८४/२०२४ भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३,(२) प्रमाणे दि. २९ जुलै रोजी या गुन्ह्याचा तपास चालू असतांना सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे दिलीप बच्छाव (वय ३५ वर्ष) रा.रोकडोबा नगर, दाभाडी, मालेगांव हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यानेच गुन्ह्यातील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्यास विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने मालेगांव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणा वरून ०७ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्या कडून दाखल गुन्ह्यातील ०१ हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल व इतर ०४ हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल व ०१ बजाज प्लेटिना मोटार सायकल व ०१ एच एफ डीलक्स अशा एकूण ०७ मोटर सायकल एकुण ०१ लाख ५० हजार रुपये किंमती च्या हस्तगत करण्यात आल्या असून मिळालेल्या मोटार सायकल या सदर इसमाने मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे, मालेगांव शहर पोलीस ठाणे, मालेगांव छावणी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले.

वरील कारवाईसाठी पोलीस ठाणे कडील पो.ह ११८२ मनोज सिंगर,पो.नाईक २१०४ सचिन गोसावी, १५४१ हितेश भामरे, १०११ योगेश मोरे तसेच विशेष पथकातील पो.शिपाई १५३८ राकेश जाधव, २६९९ राम मिसाळ यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस नाईक १६२५ हरीश कोळी हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या