
🔴 सौ.मंजुळाबाई हायस्कूल खतगाव चे पर्यवेक्षक आईन्लावार मारोती यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड (देगलूर) ता. प्रतिनिधी
9923072242
दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी बिलोली तालुक्यातील खतगाव येथील सौ.मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यरत विज्ञान विषयाचे सहशिक्षक तथा पर्यवेक्षक आईन्लावर मारोती रामन्ना हे नियत वयोमानानुसार दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांचा खतगाव येथील शाळेच्या सभागृहात यथोचित सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करून पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आले.
खतगाव येथील सहशिक्षक तथा पर्यवेक्षक आईन्लावर मारोती रामन्ना हे मूळ देगलूर तालुक्यातील दरेगांव येथील आहेत. ते १६ जून १९९१ रोजी खतगाव येथील सौ मंजुळाबाई हायस्कूल शाळेवर रूजू होत आज पर्यंत त्यांनी या शाळेत आयुष्यातील ३३ वर्ष १७ दिवस सेवा बजावत विज्ञान विषय अध्यापनात अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांची व्यक्तिरेखा ही अतिशय शांत स्वभाव अभ्यासू, विद्यार्थी जिज्ञासू होती. ते विज्ञान विषयाचे अध्यापन करीत असताना सूक्ष्म दृष्टी अध्यापन करून अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण केली. अशा या शांत व संयमी सह शिक्षकाचा बुधवारी नियतकालीन सेवा समाप्त झाली असल्याने अनेकांनी शुभेच्छा दिले.
यावेळी सेवापूर्ती गौरव सोहळ्यास श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाचालक बाळासाहेब पाटील खतगावकर, मुख्याध्यापक मारोती पिन्नलवार, शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी, अनेक आजी-माजी विद्यार्थी, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार खतगाव व दरेगाव येथील पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यवेक्षक आईन्लावार मारोती यांना सेवापूर्तीचे शुभेच्छा दिल्या आहेत.















