16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️कोणताही राजकीय नेता चिखलातून चालत गावात येऊन दाखवावे.

🔴 सालेगाव रस्त्याची दुर्दशा सालेगाव अंतर्गत रस्त्यावर चालणे झाले कठीण, गावात जाणे सुद्धा होते अवघड, आमदार व जिल्हा परिषद सदस्य गावात येऊन चिखलात चालून दाखवा.

निवडणुकीवर बहिष्कार टाकणार सालेगाव येथील नागरिकांची प्रतिक्रिया.

नायगाव प्रतिनिधी : दिपक घुंगराळेकर

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील कुंटूर पासून ०७ कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे सालेगाव येथील गावांमध्ये जाण्यासाठी व गावाच्या बाहेरून येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. सर्वत्र चिखलाचे चिखलच रस्ता होऊन गेला असून गेल्या ३० वर्षापासून या गावाला डांबरीकरण रस्ता झाला नाही. त्यातही सी.सी. रस्ते नाहीत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी लक्ष देत नसल्याने गावामध्ये सुद्धा चिखलाचे साम्राज्य पसरले आहे . निवडणूक २०१९ मध्ये राजेश पवार यांनी आमदार होण्या अगोदर येऊन गावात आश्वासन देऊन गेले. मात्र पुन्हा गावाकडे फिरकले नाही त्यातही जिल्हा प. स. राजेश गंगाधरराव कुंटूरकर यांनी सुद्धा गावात मतदान मागायला आले. निवडून आल्यानंतर पुन्हा रोड तयार झाल्यावर गावात येणार अशी आश्वासन दिले, मात्र निवडून येऊन दहा वर्षे होऊन गायब झाले, असून पुन्हा सालेगाव मध्ये कोणी पाऊल ठेवले नाही, त्यामुळे सालेगाव येथील नागरिक संतप्त झाले असून गावात जाणे व गावाच्या बाहेर जाणे सुद्धा होत नाही अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल झाल्याने नागरिकांचा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. येणाऱ्या विधानसभा व जिल्हा परिषद निवडणूकीवर बहिष्कार टाकणार. तसेच ग्रामपंचायतचा ठराव घेणार असल्याची नागरिकांनी यावेळी वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्यांच्या मनातील राग कार्यकर्ते असो व लोक प्रतिनिधी यांच्या विषयी भरभरून बाहेर वाईट शब्दांमध्ये निघत आहे.

त्यामुळे 30 वर्षापासून आम्ही चिखलाचा सामना करत असून कोणत्याही लोक प्रतिनिधींनी गावाकडला रस्ता व गावातील रस्ते बनवून दिले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा सर्व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणताही नेता गावाचा रस्ता धरून येणार नाही व त्यांना गावात पाऊल ठेवून देणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी दिली आहे. जि.प. सदस्य राजेश कुंटूरकर व आमदार राजेश पवार आमदार यांनी सालेगाव चा दौरा करून गावात पायी चालून दाखवावे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या