
🔴 देगलूर शहरातील अतिक्रमणावर हातोडा तर वाटसरूंनी घेतला मोकळा श्वास.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी (९९२३०७२२४२)
देगलूर शहर हे व्यवसाय ने गजबजलेले असून, अतिक्रमणामुळे शहरातील तालुक्यातील नागरिकांना रस्त्यावर चालणे कठीण सुद्धा होत होते. रस्त्यावरच भाजी विक्री, हातबंड्या, मुख्य रस्त्यावरच लावलेले दुचाकी वाहने, पानपट्ट्या तर काही काही महाभागाने रस्त्यावरच दुकान थाटून शटर ची सुद्धा व्यवस्था केली होती. शहरातील अशा अतिक्रमणामुळे मुख्य रस्ते अति अरुंद झाले होते. २० ते २५ फूट असलेले रस्ते ( नालीचे बांधकाम सोडून) ०८ ते १० फूटांपर्यंत शिल्लक होते. अशातच रस्त्यावरून नागरिकांना वावरतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला म्हणून जनते मधून प्रचंड रोष निर्माण झाला होता.
अशा अडगळीच्या त्रासाला कंटाळून देगलूर पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, नगर मालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना दूरध्वनी द्वारे कल्पना दिली. याची दखल घेत प्रशासनाच्या ताफ्याने जेसीबी च्या माध्यमातून रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. यावेळी काही दुकानदारांनी आपले स्वतः शेड इतर सामान काढून घेतले शेवटी नाईलाजाने जेसीबीच् या माध्यमातून हटविण्यात आले. देगलूर शहरातील जुना सराफा, लोहिया मैदान, भाजी मार्केट, तळगल्ली या ठिकाणच्या अतिक्रमणावर हातोडा चालविला. तसेच जीव मुठीत धरून नगरपालिका वाचनालयास जावे लागत होते या ठिकाणी पण रस्ता मोकळा झाला. आशा वर्दळीच्या ठिकाणी रस्ता मोकळा झाल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.
परंतु एवढे खरे आहे की, कालांतराने पूर्व परिस्थिती होऊ नये एवढी नागरिकांची अपेक्षा…















