
🔴 रोजनदारी कर्मचाऱ्यां त्वरित नियुक्ती आदेश द्यावेत.
शिवगर्जना न्यूज,
सुरगाणा प्रतिनिधी: दिनेश गावित
कळवण : गुरुवार दिनांक २५ जुलै २०२४ रोजी कळवण सुरगाणा मतदार संघाचे मा.आमदार कॉ जे पी गावीत यांनी २५ जुलै रोजी सकाळी कळवण प्रकल्प कार्यालयी भेट दिली, यावेळी कळवण कार्यालयी रोजंदारी पदासाठी फेरी घालणारे शेकडो अर्जदार उपस्थित होते, त्यांच्या समवेत कॉ गावीत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन आदेश देण्यास का विलंब लावला जातोय याची माहिती घेतली आणि त्यानंतर लगेचच कॉ.जे.पी गावीत, कॉ. वसंतराव बागुल, कॉ. गुजर यांनी नाशिक येथे जाऊन आदिवासी विकास आयुक्त मा. नयना गुंडे यांची भेट घेतली. यावेळी कॉ जे पी गावीत यांनी आदिवासी विकास विभागातील रोजनदारीने काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना नियुक्ती आदेश द्यावेत या संदर्भात चर्चा केली. कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेत शिक्षक नसल्याने आदिवासीं मुलांचे मोठया प्रमाणावर शैक्षणीक नुकसान होत आहे, अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार, पहारेकरी, या व इतर कर्मचारी नसल्याने जेवणाचे व संरक्षनात्मक दृष्ट्या अडचणी निर्माण होत आहेत. गोर गरीब आदिवासी बांधवांच्या मुलांसाठी कर्मचारी नसणे येणाऱ्या पिढीसाठी मोठा धोका आहे.
सबंध जिल्ह्यात आणि कळवण सुरगाणा तालुक्यातील हजारों उच्च शिक्षित युवक युवतींना पात्रता असूनही नोकरी नाही, रोजगार नाही, व्यवसाय नाही, त्यामुळें त्यांचे त्यांचें आयुष्य अंधारात चालले आहे, त्यांना शासन नोकरी तर देत नाहीच आणि त्यात रोजनदारी नियुक्तीही केली जात नाही, वर्षानुवर्ष काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशही देण्यास जाणीव पूर्वक टाळाटाळ केली जात आहे. हे योग्य नाही, यावर त्वरित निर्णय घेऊन येथील होतकरू युवती युवकांना नियुक्त आदेश देण्यात यावे या बाबत माननीय आयुक्त गुंडे मॅडम यांना कॉ.जे.पी. गावीत यांनी विनंती केली.
चर्चेनंतर माननीय आयुक्त गुंडे मॅडम येत्या सोमवार पर्यंत आदेश देण्याचे सांगण्यात आले, यावेळी कॉ.जे.पी. गावीत यांनी सांगितले की जर सोमवार पर्यंत कर्मचाऱ्यांना आदर्श दिले नाही तर मंगळवार पासून तीव्र आंदोलन उभारले जाईल याची शासणाने दखल घ्यावी असे सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कॉ वसंतराव बागुल, कॉ किसन गुजर , धनजी चौधरी, सुबान गांगोडे, सचिन वाघ आणि रोजनदारीने शासकिय आश्रमशाळा विभागांत काम करण्यासाठी नियुक्ती आदेश मागणारे युवक, युवती उपास्थित होते.















