16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️जिल्हा परिषद शिक्षकांनी खाजगी क्लास घेतल्यास होणार कठोर कारवाई.

🔴 जिल्हा परिषद शाळेच्या खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.

शिवगर्जना न्यूज, 

उमरी तालुका प्रतिनिधी : महेश पडोळे

उमरी : तालुका दौऱ्यावर नांदेड जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिनल करणवाल मॅडम हे उमरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भेटी दरम्यान, गोरठा येथे संत दासगणू महाराज प्रतिष्ठान येथील दर्शनासाठी आले असता, खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (सी.सी.टी.एफ.एम) आणि (पी.टी.ए) यांचे पदाधिकारी व सदाशिव पालदेवाड सर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना उमरी तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक हे खुले आम जाहिराती करून क्लासेस घेत आहेत असे सांगितले गेले. एका बाजूला बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊन सुध्दा त्यांना नोकरी नाही, म्हणून काहीतरी करून आपली उपजीविका भागवत आहेत. आणि हे शिक्षक ज्यांना शासन हजारो रुपये पगार देऊन सुध्दा खाजगी शिकवणी घेत आहेत, त्यांना जर खाजगी क्लास घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी नक्की घ्यावं परंतू त्या अगोदर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर ते शिक्षक कोणत्या शाळेचे आहेत, आणि त्यांचे नाव हे पूर्ण माहिती मॅडम यांना देण्यात आली आहे. आणि त्यांच्यावर कठोरातील कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे. यावर मा. करनवाल मॅडम यांनी सांगितले की, सदरील जे शिक्षक जिल्हा परिषदेचे शिक्षक खासगी क्लासेस घेत त्यांची चौकशी लाऊन त्यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या