16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️बारूळ धरणातील पाणी उदगीर ला जाऊ देणार नाही.

🔴 नायगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बारुळ धारणाचे पाणी उदगीरला जाऊ देणार नाही. 

 

▪️जनतेसमोर पिण्याच्या पाण्या सह मोठा अडचणी चा प्रश्न भविष्यात निर्माण होणार.— गजानन पाटील चव्हाण.

शिवगर्जना न्यूज, 

नायगांव प्रतिनिधी

दिपक गजभारे घुंगराळेकर.

दिनांक:- २४ /०७/ २०२४ रोजी निम्न मानार प्रकल्प, प्रकल्प बारूळ धरणाचे पाणी उदगीर जाम व जळकोट या शहरां सह पाणीपुरवठा साठी जाणाऱ्या पाईपलाईन कामास तात्काळ स्थगिती मिळणेसाठी मा.जिल्हा अधिकारी नांदेड यांच्यामार्फत मा.जलसंपदा मंत्री यांना तक्रारी निवेदन देण्यात आले, तसेच नायगाव उमरी धर्माबाद खंधार मुखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी व कार्यकर्ते तथा निम्मे मानणार प्रकल्प बारूळ पाणी बचाव संघर्ष समिती नांदेड यांच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन स्थगिती लावून धरले आहे.

बारूळ धरणातून उदगीर शहर व जळकोट व जाम या गावा सह मोठ्या प्रमाणामध्ये पाईप लाईने बारुळ धरणातील पाणी उदगीर व जळकोट जाणारे पाणी तात्काळ थांबले पाहिजे तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनचे काम चालू असल्याचे कळताच जिल्हा अधिकारी मार्फत जलसंपदा मंत्री सह संबंधित सर्वांकडे उचित कारवाई करून तात्काळ स्थगिती मिळावी यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व तथा पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण सह सर्व पदाधिकारी होते, सदर प्रकल्पाच्या या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा उपयुक्त पाणी साठा खुपच कमी झाला आहे. तसेच या प्रकल्पाच्या उर्ध्व बाजूस लिंबोटी धरण निर्माण झाले आहे, त्यामुळे धरणात येणारा येवा कमी झाला. परिणामी प्रकल्पाचे सिचन क्षेत्र घटले आहे.

नायगाव कंधार मुखेड विधानसभा मतदार सघातील नायगाव, बिलोली,मुखेड मधील अगोदरच्या उन्हाळ्यामध्ये आणि भविष्यात शेतकर्याना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी व जनावरे गाय गुरे वण प्राणी पक्षी पाणी मिळनार नाही आणि मिळत नसल्याने स्थानिकामध्ये रोष निर्माण होत झाला आहे 

वरील दोन शहरास या प्रकल्पातून पाणी स्थानिक शेतकर्याच्या संकटात आणखी भर पडला आहे. या प्रकल्पावर नायगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधव तसेच बिलोली देगलूर आणि मुखेड मतदार संघ चा अनेक भाग या मतदार संघातील अशा तिन्ही मतदारसंघातल्या सर्व शेतकरी शेतकरी बांधवांच्या शेतीला आणि पिण्याचा पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.

आमच्या झोपेत हा मोठा घात झाला आहे हे शेतकऱ्यावर होणारे अन्याय तात्काळ थांबले पाहिजे तथा पाईप लाईन कामास स्थगिती मिळाली पाहिजे अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघ निहाय जन आंदोलन सह जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नाइलाजास्तव करण्यात येईल याची गांभीर्यादा नोंद घ्यावी अन्यथा न्यायालयामध्ये धाव घेण्याचे ठरले आहे. अशी मागणी लावून धरत पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण, पोलीस पाटील भागवत भुताळे, कर्मवीर भाऊराव पाटील चव्हाण, सामाजिक नेते व्यंकटराव घोरपडे जयराम शिंदे, शिवसेना शहर प्रमुख गजानन पा.तमलुरे, श्रीराम पवार, बालाजी अल्लेवाड, अनिल रजितवाड, गणेश शिर्के ताकबिडकर, श्रीनिवास कदम, हनुमंत खंडेजोड, हंगरगा, संभाजी विश्वकर्मा, ओमाजी वाघमारे, देविदास पा वडजे, किशोर महाराज धर्माबादकर नर्सिंग देवकर, बापूराव वाघमारे, जयराम इबितवार सुजलेगावकर, विठ्ठल बोरीकर, अमोल इबितवार, या सह विविध क्षेत्रातील शेतकरी कामगार सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन विविध पक्षाचे कार्यकर्ते सह उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या