13.4 C
New York
Thursday, May 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️विद्यार्थ्यांनो महापुरुषांना जातीत बांधू नका — शंकर कुद्रे

♦️विद्यार्थ्यांनो महापुरुषांना जातीत बांधू नका — शंकर कुद्रे. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी : ९९२३०७२२४२

“विद्यार्थ्यांनो महापुरुषांना जातीत बांधू नका. त्यांना वाचा, त्यांचे कार्य समजून घ्या, तरच महापुरुष कळतील” असे उद्गार साहित्यिक, समीक्षक तथा तज्ञ मार्गदर्शक शंकर कुद्रे यांनी काढले. ते परमपूज्य गोळवलकर गुरुजी विद्यालया तर्फे आयोजीत नेतृत्व गुण विकास शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूरचे सुप्रसिध्द व्यापारी नारायणशेठ पोलावार होते. 

▪️परम पूज्य गोळवलकर गुरुजी विद्यालयातर्फे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढीसाठी एक दिवसीय शिबिर दरवर्षी आयोजीत करण्यात येते. तसेच यावर्षी सुद्धा येथील राजशेखर मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आले होते. पाच सत्रा पैकी सत्र दुसऱ्या व्याख्यानाचे पुष्प श्री शंकर कुद्रे यांनी गुंफले. पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जन्मवर्षे निमित्ताने त्यांच्या विषयी व श्रम शक्ती या विषयी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे असे ही म्हणाले की, जगातील महिला राज्यकर्त्यामध्ये मॉ जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांचे नाव अग्रगण्य ठिकाणी आहे. आम्ही वाचले नसल्यामुळे महापुरुष समजत नाहीत म्हणून अवांतर वाचन वाढवावे. श्रमाला महत्त्व द्या. श्रम शक्ती वाढवीली तरच आयुष्यात यशस्वी व्हाल. अध्यक्षीय समारोप करताना श्री. नारायण शेठ पोलावार यांनी विद्यार्थ्यांनो प्रथम माणूस बना असे आव्हान केले. 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री गंगाप्रसाद कळसकर, सौ. वझलवार, सौ. अटकळीकर, सौ. गोले, निरीक्षक सौ. गोविंदवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. केंद्रे, विभाग प्रमुख श्री. वसंत वाघमारे, श्री. मुगटकर, श्री वझलवार, श्री कुलकर्णी, पांचाळ मॅडम, तसेच इतर शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या