25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️पीएम विश्वकर्मा योजना फक्त नावालाच.

♦️पीएम विश्वकर्मा योजना फक्त नावालाच. 

▪️अर्जदारांना योजनेच्या लाभासाठी अनेक अडचणी… 

शिवगर्जना न्यूज, 

उमरी प्रतिनिधी:- महेश पडोळे 

तालुका उमरी येथे पीएम विश्वकर्मा योजना संदर्भात विश्वकर्मा वंशी समाज संघटना अमृत तालुक्याच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी येत असलेल्या अडचणी संदर्भात दिनांक २४ जून रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनात असे नमूद केले आहे की, पीएम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरल्यानंतर अर्जदारांना व्यावसायिक क्षेत्रामध्ये मदत म्हणून लोन भेटणार होते. त्याचबरोबर व्यवसाय संदर्भात ट्रेनिंग व त्या ट्रेनिंग चे सर्टिफिकेट त्यानंतर टूलकिट या योजनेद्वारे दिले जाणार होते परंतु विश्वकर्मा बांधवांनी या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरला असला तरी त्यांना ट्रेनिंग साठी बोलवले गेले नाही व या योजनेचा हवा तसा लाभ दिला गेला नाही. व याजनेचा लाभ तालुक्यातील बांधवांना मिळावा म्हणून बँकांना लोन देण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन जिल्हा अध्यक्ष साईनाथ श्रीराम मुटकुटवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय या ठिकाणी उमरी तालुका विश्वकर्मा समाज संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष पांचाळ गोळेगावकर, यांनी दिले यावेळी डॉ. रामेश्वर पांचाळ (उपाध्यक्ष) सतीश पांचाळ मुटकुटवार (उपाध्यक्ष) गणेश मुटकुटवार (शहराध्यक्ष) यांसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या