⏰ राष्ट्रवादी युवक काँग्रेस देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष पदी मिलिंद कावळगावकर तर राष्ट्रवादी युवक देगलूर तालुका अध्यक्ष पदी नरेश पाटील यांची निवड ⏰
देगलूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशअध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार लातूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी नांदेड जिल्हा दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील मूकनर यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस देगलूर – बिलोली विधानसभा अध्यक्ष पदी मिलिंद काळगांवकर तर राष्ट्रवादी युवक देगलूर तालुका अध्यक्ष पदी नरेश पाटील यांची निवड करून नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिले. या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, माझे मार्गदर्शक तथा कॅबिनेट मंत्री मा.संजय बन्सोडे, राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज दादा चव्हाण, राष्ट्रवादी नांदेड जिल्हा अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी युवक नांदेड जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील मुकनर यांनी माझ्यावर विश्वास दाखवून देगलूर बिलोली विधासभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची जीम्मेदारी दिल्यामुळे त्यांचा मी आभारी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
“शिवगर्जना न्यूज आवाज लोकशाहीचा”
प्रतिनिधीस बोलतांना नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी रा.यू.काॅ. देगलूर बिलोली विधानसभा मिलिंद काळगांवकर यांनी आपले मत व्यक्त केले.















