दुःखद घटना… दुःखद घटना…
⚫ ॲड सुरेश जयवंतराव देसाई देगावकर यांचे निधन रविवारी देगाव येथे होणार अंत्यसंस्कार.
देगलूर
मौ. देगाव ता. देगलूर येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तथा जेष्ठ सरकारी विधीज्ञ सुरेशराव जयवंतराव देसाई देगावकर यांचे दीर्घ आजाराने शनिवार दि. २ ऑगस्ट २५ रोजी सायंकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. एडवोकेट सुरेश देसाई हे प्रख्यात विधीज्ञ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित होते. अनेक वर्ष त्यांनी सरकारी वकील म्हणून ही कामकाज पाहिले होते. तसेच काही काळ देगलूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. शहरातील जवाहर क्लब सह इतर अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकडचा संबंध होता.
त्यांच्या पार्थिवावर रविवार दि. ३ ऑगस्ट २५ रोजी दुपारी १:०० वाजता त्यांच्या मूळ गावी देगाव( बुद्रुक) ता. देगलूर येथील शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी भारतीताई देसाई, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अंकुश देसाई देगावकर, डॉ. अक्षय देसाई देगावकर हे दोन मुले, एक मुलगी, बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक देसाई देगावकर, पांडुरंग देसाई देगावकर, पुतणे बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त योगेश देसाई देगावकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राहुल देसाई देगावकर यांच्यासह नातू, पंणतू असा मोठा परिवार आहे.
💐💐 शिवगर्जना न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती….💐💐🙏