*मराठा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा ग.मा. विद्यालय तडखेल तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.*
प्रतिनिधी: हानमंत कदम
मो: ८६९८८०३९८२
देगलूर : दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी
गटसाधन केंद्र देगलूर येथे मराठा
मुक्तिसंग्राम दिना निमित्त विविध
स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत गजानन माध्यमिक
विद्यालय तडखेल ता. देगलूर जि.
नांदेड या शाळेतील विद्यार्थिनींनी कु.
श्रुती उमाकांत सावळे वकृत्व स्पर्धेत
प्रथम क्रमांक तर कु. लक्ष्मी दत्तात्रय
पांचाळ ही रांगोळी स्पर्धेत तृतीय
क्रमांक आली असून शाळेचे
मुख्याध्यापक श्री. अटकळे एस. एम.
यांच्या हस्ते दोघींचे पुष्पगुच्छ देऊन
अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी
शुभेच्छा देण्यात आले. या कार्यक्रमात
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी शाळेतील सर्व विद्यार्थी
विद्यार्थिनींनी उपस्थित होते.