14.7 C
New York
Tuesday, May 5, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️कोलंबी येथे सगर पुत्र महातपस्वी राजा भगिरथ यांची जयंती साजरी

🔴 कोलंबी येथे सगर पुत्र महातपस्वी राजा भगिरथ यांची जयंती साजरी.

शिवगर्जना न्यूज,
नायगाव ग्रा. प्रतिनिधी :
दिपक गजभारे

कोलंबी येथे सगर पुत्र महातपस्वी राजा भगिरथ यांची जयंती दि.१४ जानेवारी २०२५ रोज मंगळवार रोजी दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर सर्व सगर समाज बांधव व राजाभगिरथ मंडळ कोलंबी यांच्या पुढाकारातून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सगर समाजासाचे भुषण व गावचे माजी सरपंच कोंडीबा हौसाजी बुरपल्ले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री १०८ महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांचे प्रतिनिधी दयाळबन महाराज व गावचे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी.जी.पाटील रातोळीकर व सचिव एस.जे.बोंडले आणि प्रमुख व्याख्याते राणाप्रतापसिंह चंदावाड होते.

महातपस्वी राजा भगिरथ यांची जयंती दरवर्षी गावातील सर्व सगर बांधव व इतर सर्व समाज बांधवांना एकत्र बोलावून साजरी केली जाते. प्रमुख व्याख्याते राणाप्रतापसिंह चंदावाड सर यांनी आपल्या पूर्वज काळातील राजा भगिरथ यांचा सर्व इतिहास सांगत असताना राजा भगिरथाने ज्या प्रमाणे आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी महातपस्या करून पृथ्वीतलावर गंगा आणली त्या गंगेचा उपयोग सगर पुत्रानाचं झाला नाहीतर पृथ्वी तलावरील सर्व पशु पक्षी सर्व सजीवसृष्टी ला झाला. त्याप्रमाणेच आपण आपला स्वतःचा विकास न पाहता त्याबरोबरच आपल्या आई वडिलांची सेवा व आपल्या समाजा साठी एखादे चांगले कार्य करावे तेंव्हाच आपल्या जयंतीचा उद्देश साध्य होईल असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास उपस्थित गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी शिवाजी पाटील शिंदे, उपसरपंच शेख, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा गवाले,जयवंतराव बर्लेवाड, माजी सरपंच व सदस्य प्रतिनिधी व प्रल्हाद पा.बैस, प्रविण बैस, माजी सरपंच शिवाजी पा.सोनमनकर, शिवदत्त पोतलवाड, उत्तम गवाले तंटामुक्ती अध्यक्ष भिवाजी पा.शिंदे, चेरमन व्यंकटराव पा.शिंदे नब्बीसाब व गावातील प्रतिष्टीत नागरिक धोंडीबा पा.सोनमनकर, बालाजी सोनमनकर, गणेश सोनमनकर, भगवान पा. शिंदे, मनोहर बैस, विजय बैस, पंढरी पा.शिंदे, राजु पा. शिंदे, दगडू महाराज बर्लेवाड, आत्माराम कोकुर्ले, श्रीराम पांचाळ, मधुकर पा. बैस मनोहर तेलंग व समस्त सगर समाज बांधव आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजा भगिरथ मित्र मंडळ कोलंबी अध्यक्ष हणमंत घोनशेटवाड,व समस्त सगर बांधव. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नरसिंग पोतलवाड तर आभार जयवंतराव बर्लेवाड यांनी केले.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या