19.2 C
New York
Monday, April 27, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नायगाव येथे जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा केंद्राच्या नावात बदल.

🔴नायगाव येथे जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा केंद्राच्या नावात बदल. 

♦️यमुनाबाई प्राथमिक ऐवजी माध्यमिक विद्यालयात परीक्षा. 

शिवगर्जना न्यूज,

नायगाव प्रतिनिधी

नायगाव | जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा येत्या दि.१८जानेवारी शनिवार रोजी होणाऱ्या परीक्षा केंद्राच्या नावात बदल करण्यात आला असून यमुनाबाई प्राथमिक शाळा नायगाव ता. जि. नांदेड ऐवजी यमुनाबाई माध्यमिक शाळा नायगाव ता.जि. नांदेड या प्रमाणे परीक्षा केंद्राचे नाव ठरवण्यात आले आहे. तसे पत्रक १० जानेवारी रोजी प्राचार्य जे.एन.व्ही. शंकरनगर यांनी संग्राम कांबळे, गट शिक्षणधिकारी नायगाव यांना पाठवले आहे.

जवाहर नवोदय वि‌द्यालय वर्ग सहावी प्रवेश परीक्षा दि.१८ जानेवारी २०२५ रोजी आहे. नायगाव मध्ये जनता हायस्कूल, ब्ल्यूबेल्स इंग्लिश विद्यालय व यमुनाबाई माध्यमिक विद्यालय असे ३ परीक्षा केंद्र आहेत.

यातील परीक्षा केंद्र क्र. १३०६१५०३ चे नाव चुकिने यमुनाबाई प्राथमिक शाळा नायगाव ता. जि. नांदेड ४३१७०९ लिहिल गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची दिशाभुल होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी या परीक्षा केंद्राचे वास्तविक नाव यमुनाबाई माध्यमिक शाळा नायगाव ता. जि. नांदेड ४३९७०९ असे करणे गरजेचे आहे. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी गट शिक्षणाधिकारी नायगाव यांना पत्र पाठवून झालेला बदल कळवला आहे. सद्याला या सेंटर चे नाव यमुनाबाई माध्यमिक शाळा नायगाव ता. जि. नांदेड ४३१७०९ असे असून झालेला बदल संबंधित शाळा, मुख्याध्यापकांमार्फत विद्यार्थी तथा पालकापर्यंत पोहचवावे असे, 

सुहास मांडले प्राचार्य ज.न.वि. शंकरनगर जि. नांदेड यांनी कळवले आहे.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या