
🔴 खानापूरात पशुधन व्यवस्थापन पदविका विद्यालयात पशुरोग निदान शिबिर संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी
देगलूर | खानापूर येथील संभाजी पाटील पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालयात ता.१० जानेवारी रोजी पशुरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बालाजीराव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देगलूर येथील पशुधन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.बुच्छलवार, पशुधन विकास अधिकारी डॉ.पाशमवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.खेत्री, डॉ.यंकम, डॉ.कानगुले यांनी जनावरांची तपासणी करून उपचारा बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ४० जनावरांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.स्वामी, हिमगीरे, शिंदे, इंगळे यांचे सह विद्यार्थी व पशुपालक उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.नंदकुमार गायकवाड व समन्वयक डॉ.अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
◼️खानापूर येथील संभाजी पाटील पशुधन व्यवस्थापन व पदविका विद्यालयाच्या वतीने पशुरोग निदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बालाजीराव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनावरांचे मोफत तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















