
🔴 ग्राहकाची फसवणूक टाळण्यासाठी निवारण समितीचे काम महत्त्वाचे तहसीलदार सूर्यवंशी
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्र. : 9923072242
देगलूर | सध्याच्या स्पर्धेचे युगात जाहिरातीतून फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोशल मीडियातून कोण कोणाचा आवाज काढून फसवेल हे ही सांगता येणार नाही. यासाठी विक्रेते व ग्राहक यांच्यात समन्वयातून सुसंवाद असणे गरजेचे आहे. यदाकदाचित वाद निर्माण झालाच तर त्याचे निराकरण करण्याचे काम ग्राहक तक्रार निवारण समिती करेल असे मत तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार सौ.गंदुगुडे मॅडम उपस्थित होते. एखाद्या वेळेस विक्रेते व ग्राहकात वाद झालाच तर अशा संबंधातून मार्ग निघतो. येथील ग्राहक तक्रार निवारण समिती विविधाअंगी असल्याने ते समाजात चांगले काम करेल अशा आशावाद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी समितीचे तालुका अध्यक्ष सुभाष आप्पा देगलूरकर यांनी ही आजकाल सुशिक्षित मनवणाऱ्या नागरिकांनाच फसवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत .अशिक्षितांना तर याचा मोठा फटका बसतो. मात्र फसवले गेलेल्यांनी समितीपर्यंत येण्याचे धाडस दाखवले तर त्यांना नक्कीच न्याय देण्याचे काम समितीच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. प्रास्ताविकात सचिव संतोष शिंदे यांनी ग्राहक तक्रार निवारण समितीच्या कार्याची माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य हणमंत जाधव, कोषाध्यक्ष चंद्रशेखर लगडे, कायदेविषयक सल्लागार कृष्णा जोशी, निवृत्त लेखाधिकारी वैजनाथ स्वामी, सहसचिव प्रा. डॉ. आनंद वळंकीकर यांनी ग्राहक विक्रेत्यांमध्ये होणाऱ्या तक्रारीमध्ये निवारण समितीचे काय काम असते हे उदाहरणासह स्पष्ट केले. कार्यक्रमाला रावसाहेब चाकूरकर, विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी गंगाधरराव गुंगेवार, शंकरराव रायकोडे, मारोती परबते, श्री झरीकर, यांच्यासह ग्राहक व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हणमंत जाधव यांनी मानले व राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















